“मी इच्छुकांना वैतागून नगरला येणं टाळतो”

अहमदनगर : नगरला आलो आणि गाडीतून खाली उतरलो, की कोण कोण भेटतो आणि विधानसभेचे तिकीट मागतो. मात्र, मला यातून अलिप्त राहायचे आहे. त्यामुळे मी नगरला येणेच टाळत आहे. महिनाभरानंतर मात्र दररोज येणार आहे, अशी कबुलीच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात देऊन टाकली.

एका व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी डॉ. विखे नगरला आले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाषण केले. त्यामध्ये हसत हसत त्यांनी ही कबुली दिली. लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर डॉ. विखे कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर भागात दिसत असले, तरी त्यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण भागात आणि नगर शहरातही ते फारसे दिसत नसल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी भाषणात आपण नगर का टाळत आहोत, याचा खुलासा करून टाकला.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नगरचे माजी पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी राजकारणात यावे, अशी मागणी काही वक्त्यांनी केली होती. तो धागा पकडून डॉ. विखे यांनी यावर भाष्य केले.

कृष्णप्रकाश यांना अधिकारीच राहू द्या, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची राज्याला गरज आहे. राजरकारणासाठी आम्ही आहोत. आधीच येथे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यात आणखी भर पडायला नको. इच्छुकांना वैतागूनच आपण सध्या नगरला येणे टाळत आहोत, असंही सुजय विखे म्हणाले आहेत.

गाडीतून उतरले की कोणी ना कोणी भेटते आणि उमेदवारी मिळवून देण्यासाठी विनंती करते. वास्तविक, आपल्याला या प्रक्रियेपासून अलिप्त राहायचे आहे. त्यामुळे आपण इकडे येणेच टाळत आहोत. महिनाभरात ही प्रक्रिया संपेल. त्यानंतर आपण सतत नगरला असू आणि पुढील संपूर्ण काळ या मतदारासंघात काम करू. विश्वास ठेवा आणि एवढा महिना सवलत द्या, असंही त्यांनी सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-