मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची (Cabinet Meeting) बैठक पार पडली.
आजच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (Pradhan Matri Garib Kalyan Ann Yojana) सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच निर्णय घेण्यात आला आहे.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर एक संदेश देखील दिला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे 80 कोटी नागरिकांना लाभ झाल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.
भारतवर्षाचं सामर्थ्य देशातील एक एक नागरिकाच्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीला ताकद देण्यासाठी सरकारनं या योजनेला मुदतवाढ दिल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात गरीब कल्याण योजनेद्वारे देण्यात येणार धान्य देशातील नागरिकांना देण्यात येतं. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड आहे त्यांना धान्य मिळतं.
ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही त्यांना या योजनेद्वारे धान्य मिळत नाही. कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव
‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
‘कुणीही कायदा हातात घेतला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा
“माझ्या हत्येचे कटकारस्थान रचले जात आहे”
“आता बाॅलिवूड, टाॅलिवूड म्हणण्याऐवजी ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ म्हणावं”