मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

मुंबई | सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बहुमत चाचणी विरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. बहुमत चाचणीवरून राज्यातील वातावरण तापलं असताना राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे.

राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. महाविकास आघाडीची आजची कॅबिनेट बैठक शेवटची असल्याच्या चर्चा रंगत असताना कॅबिनेट बैठकीत आज 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील नाव देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर व उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजूरी मिळाली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत तीन अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

राज्यात महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर झाले असताना सर्वोच्च न्यायालयात अॅडव्होकेट कौल यांनी शिवसेनेविरोधात जोरदार युक्तिवाद केला आहे.

दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! बहुमत चाचणीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

‘बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, मुंबईत येताच…’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

“हारी बाजी को जितना जिसे आता है वो देवेंद्र कहलाता है”

राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, उद्या बहुमत चाचणी होणार?

आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिंदे गट सरसावला, केली ‘ही’ मोठी घोषणा