गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांची संख्या 33610 वर

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला असल्याची माहिती आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार 610 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1075 जणांचा मृत्यू झाला आहे.

24162 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 8373 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 67 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1823 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

-“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

-एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये- उद्धव ठाकरे

-“काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय”

-परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल