‘चहा, कॉफी किंवा पाण्यात ते चार थेंब टाक आणि त्याला ते पिऊ दे’; रियाच्या आणखी एका व्हाट्सअॅप चॅटमुळे खळबळ

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपविला आहे. नुकतंच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच व्हाट्सअॅप चॅट समोर आलं होतं.

रिया आणि महेश भट्ट यांचे काही अनसीन फोटोसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे रिया आणि महेश यांच्यामधील संबंधांविषयी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशांत सिंह राजपूतचे अनेक चाहते रिया चक्रवर्तीच्या अटकेची मागणी करत आहेत. सीबीआयच्या हाती रियाच्या मोबाईल मधील आणखी काही धक्कादायक व्हाट्सअॅप चॅट लागली आहेत.

सीबीआयच्या हाती लागलेल्या चॅटींग्जमध्ये रिया अनेकांशी ड्रग्ज विषयी बोलताना आढळली आहे. यामुळे आता सुशांत प्रकरणी सीबीआय टीमला मनी लॉंड्रींगच्या व्यतरिक्त ड्रग डीलींगचा संशय येऊ लागला आहे. सुशांत प्रकरणी ड्रग डीलींगचा संशय येऊ लागल्यानं आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो देखील याप्रकरणी चौकशी करू शकते.

रियाच्या व्हाट्सअॅप चॅटमधील एका चॅटमध्ये रिया जया साहा नावाच्या महिलेशी बोलत होती. यामध्ये जया रियाला म्हणाली आहे की, ‘चहा, कॉफी किंवा पाण्यात ते चार थेंब टाक, त्याला ते पिऊ दे आणि परिणाम पाहण्यासाठी 30 ते 40 मिनिट थांब.’ रिया आणि जयामध्ये हे चॅट 25 नोव्हेंबर 2019 रोजी झालं आहे.

दुसऱ्या एका व्हाट्सअॅप चॅटमध्ये रिया गौरव आर्या नावाच्या व्यक्तीशी बोलत आहे. गौरव आर्या हा एक ड्र.ग डीलर असल्याचं म्हटलं जात आहे. ‘जर आपण हार्ड ड्रग्ज विषयी बोललो तर मी ते जास्त वापरले नाहीत,’ असं गौरव 8 मार्च 2017 रोजी रियाला म्हटला आहे.

दरम्यान, ईडीला देखील रियाच्या मोबाईलमध्ये एका ड्रग्ज डीलरचा नंबर मिळाला होता. त्यामुळे रिया चक्रवर्ती सध्या सीबीआयच्या चांगलीच रडारवर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अजब चोरीची गजब गोष्ट! …म्हणून हा तरूण फक्त रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरायचा; कारण वाचूल व्हाल हैराण

सुशांतचा मित्र संदीप सिंह विषयी धक्कादायक माहिती समोर!

‘कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होऊ शकतो’; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

…तर मग आरोग्यमंत्री राजेश टोपेंवरही गुन्हा दाखल करा- सुजय विखे पाटी

…तर सीबीआयला रिया चक्रवर्तीला अटक करावीच लागेल- सुब्रमण्यम स्वामी