मी विरोधी पक्षात तेव्हाही आणि आताही… मला याची खंत नाही उलट मी आनंदी आहे- विखे

मुंबई : मी विरोधी बाकावरच तेव्हाही होतो, आताही आहे. मला याची काहीही खंत नाहीये. मी आनंदी आहे की माझ्या अनुभवाचा जास्त उपयोग होतोय. आमचे एकेकाळचे मित्र आम्हाला सोडून गेलेत मात्र त्यांना केव्हा ना केव्हा याची उपरती होईल, असं भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते विधीमंडळात ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर पत्रकरांशी बोलत होते.

आज सभागृहात जे कामकाज झालं ते कोणत्याही नियमाला आणि प्रथेला धरून नव्हतं. अश्या सभागृहात बसणं काही उपयोगाचं नव्हतं म्हणून आम्ही सभात्याग केल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

आत्तापर्यंतच्या माझ्या 25 ते 30 वर्षांच्या विधानसभा कामकाजाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षाची निवड होते आणि मग विश्वासदर्शक ठराव होतो. प्रोटेम अध्यक्षाचं काम फक्त शपथ देणं असतं. त्यांच्या अध्यक्षतेखाली विश्वासदर्शक ठराव घेत नाही किंबहुना होत नाही, असंही विखे पाटील म्हणाले.

महाआघाडीला त्यांचे आमदार फुटण्याची भिती होती म्हणूनच त्यांनी पहिल्यांदा विश्वासदर्शक ठराव घेतला, अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

महत्त्वाच्या बातम्या-