मुंबई | राधिका आपटे ही बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. ती प्रत्येक वेळी आपल्या अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
राधिका लवकरच विक्रांत मेस्सीसोबत फॉरेन्सिक या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
राधिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, सुरूवातीला तिला शरीरात बदल घडवून आणण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया आणि बोटॉक्स करण्यास सांगितलं गेलं.
करिअरच्या सुरुवातीला मला अनेक शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आलं होतं. यामुळे मला दडपण जाणवत नव्हतं पण खूप राग यायचा, असं राधिकाने सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच मला एका चित्रपटासाठी नकार देण्यात आला. याचं कारण फार विचित्र होतं. अनेकदा माझी तुलना दुसऱ्या अभिनेत्रींसोबत केली जायची, असं राधिका म्हणाली.
तुझ्या तुलनेत त्या अभिनेत्रींची ओठ आणि छाती ही अधिक चांगली आहे. त्या तुझ्यापेक्षा जास्त आकर्षक आहेत आणि त्या फार काळ चालतील, असं मला सांगण्यात आलं.
अनेकांनी पहिल्याच भेटीमध्ये मला नाकाची सर्जरी कर, असं सांगितलं. तर दुसऱ्या भेटीत तुझ्या स्तनाची सर्जरी करुन घे, असा सल्ला दिल्याचं राधिकाने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी बातमी; भाजपच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना फोन
“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी”
“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा