काँग्रेसचा पाचही राज्यात दारूण पराभव, राहुल गांधी म्हणाले…

नवी दिल्ली | पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. एकमेव सत्ता असलेल्या पंजाब राज्यातील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली.

काँग्रेसला कोणत्याही राज्यात म्हणावं असं यश मिळालं नाही. त्यामुळे आता काँग्रेस नेते नाराज असल्याचं दिसतंय. त्यावर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेचा निर्णयाचा आम्ही नम्रपणे स्वीकारतो. ज्यांना जनादेश मिळाला आहे अशा सर्व विजेत्यां आमदारांना शुभेच्छा, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

या पाचही राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या या कठोर मेहनतींचं त्यांनी कौतुक देखील केलंय. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करतो, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

आम्ही या निवडणुकीतून शिकू, जरी पराभव झाला असला तरी देखील लोकांच्या हितासाठी काम करत राहू, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोर लावला होता. मात्र, काँग्रेस उत्तर प्रदेशात भुईसपाट झाल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“महाराष्ट्र अभी बाकी म्हणणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है”

पंजाबमधील पराभवानंतर शरद पवारांचा काँग्रेसला मोलाचा सल्ला, म्हणाले… 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं!

काँग्रेसलाजमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करुन दाखवलं! 

भाजपचा राऊतांना चिमटा, म्हणाले “संजय राऊत हाउज द जोश!”