डी.के शिवकुमार यांना झालेली अटक बदला घेण्यासाठी – राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे कर्नाटकातील दिग्गज नेते डीके शिवकुमार यांना मंगळवारी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजप सरकारव टीका केली आहे.

डी.के शिवकुमार यांना झालेली अटक म्हणजे बदला घेण्यासाठी केलेल्या राजकारणाचं उदाहरण आहे. सरकार विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य करत आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे, असं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहूल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य दिग्गज नेत्यांनी देखील डी.के शिवकुमार यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार, कर चुकवणे आणि पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी ईडीने डीके शिवकुमार यांना अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-