पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; वाचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळतंय. विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला आहे.परंतु, काही भागांमध्ये वरूणराजा थंडावा देत आहे.

हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 27 ते 28 एप्रिल दरम्यान पुण्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.

25 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळू शकते.

राज्यातील काही भागांमध्ये गारपीठ आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला आहे. सोलापूरमध्ये रविवारी 0.2 मिमी पाऊस झाला आहे. गोवा आणि रत्नागिरीतही पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद 42.5 अंश सेल्सियस इतकी करण्यात आलेली आहे.

दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात गारपीठ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि पश्चिम बंगालमध्ये वादळी वारे कायम राहणार आहेत.

पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे. तर पश्चिम हिमालयीन भागात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान,येत्या काही दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात घट होणार आहे. मात्र, या काही दिवसांमध्ये नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी

प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!

“…तरच राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यात येतील” 

‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण

“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”