मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवसेना नेते विश्नाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खार पोलिसांनी महाडेश्वर यांना अटक केली आहे.
सोमय्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, किरीट सोमय्या या नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस ठाण्यात आले होते तेथून परतत असताना शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला होता.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नुकतीच विश्वनाथ महाडेश्वर यांनी अटक करण्यात आली. आता या प्रकरणी महाडेश्वर यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.
किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी केला होता. सोमय्याची गाडी आपल्या पायावरून गेल्याचंही ते म्हणाले होते.
या घटनेनंतर वांद्रे पोलिस ठाण्यात किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी
प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर सोनिया गांधींनी उचललं मोठं पाऊल!
“…तरच राज्यातील मशिदींवर असलेले भोंगे हटवण्यात येतील”
‘…म्हणून आम्ही सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला’; फडणवीसांनी सांगितलं कारण
“मी खालच्या जातीची आहे म्हणत मला जेलमध्ये पाणी दिलं जात नाहीये”