Top news आरोग्य महाराष्ट्र मुंबई

उठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग

मुंबई | भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी अतिशय स्तुत्य पावलं आतापर्यंत उचलली. पण रविवारी लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपता संपता शासनाने देशातील रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी सर्वच ठिकाणची दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्ग आणि होणार्‍या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहेत. कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवलं असल्याचं डॉ. बंग म्हणाले आहेत.

दारूची दुकाने उघडल्याने तेथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील, असं अहभय बंग म्हणाले आहेत.

दरम्यान, जनतेचे हित आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू आहे तर आशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याचं डॉ. बंग म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याने उत्तर प्रदेश पोलिसांकडून अजब शिक्षा, म्हणाले…

-“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”

-भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

-UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

-“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”