राज कुंद्राने सांगितलं बेडरूम मधील ‘ते’ सिक्रेट, शिल्पा झाली शॉक; पाहा व्हिडीओ

बॉलिवूड मधील अनेक कलाकार सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा देखील सतत चर्चेत असतात. राज कुंद्रा एक बिझनेसमॅन आहे. बॉलिवूड मधील बेस्ट कपल्सपैकी हे एक कपल आहे.

हे दोघे एकत्र खूप खूश दिसत असतात. दोघेही नेहमीच सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टीव्ह असतात. शिल्पा नेहमी सोशल मीडियावर पतीसोबातचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते देखील या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टला खूप जास्त पसंती दर्शवतात.

अशातच आता शिल्पाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पतीसोबतचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका मुलाखती दरम्यानचा आहे.  या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने काही बेडरूम सिक्रेट सांगितले आहेत. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये राज कुंद्राला काही प्रश्न विचारण्यात येत असल्याचं दिसत आहे. शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिल्पाला कोणता चित्रपट आवडतो? असा प्रश्न राजला विचारण्याल आला आहे. यावर ऊत्तर देताना राज माहीत नाही, असं बोलतो.

राजला माहीत नाही हे ऐकूण शिल्पा शॉक होते. यानंतर लगेच राज ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ असं बोलतो. मात्र, राजचं हे उत्तर देखील चूकीचं ठरतं अन् शिल्पा रागवते. यावर राज म्हणतो की, माफ करा हे आमचं बेडरूम सिक्रेट आहे. यानंतर दोघेही हसू लागतात.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर सुंदर कॅप्शन देखील दिला आहे. सोशल मीडियावर  हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलाखती दरम्यानचे आणखी व्हिडीओ देखील शिल्पाने शेअर केले आहेत.

दरम्यान, अभिनेत्री पूनम पांडे हिने काही महीन्यंपूर्वी राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. राज कुंद्राने आपला फोटो चोरला असल्याचा आरोप पूनमने केला होता. पूनमने राज कुंद्रा विरुद्ध मुंबई उच्च न्यायलयात धाव घेत न्यायाची मागणी केली होती.

मात्र, राज कुंद्राने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. कोर्टाकडून अद्याप आपल्याला याप्रकरणी कोणतीही नोटीस आली नसल्याचं राज कुंद्राने स्पष्ट केलं होतं. तसेच आपल्या कंपनीने असं काहीच केलं नसल्याचंही राजने स्पष्ट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

ऐकावं ते नवलंच! अवघ्या 23 वर्षांची महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांचं आहे स्वप्न

बाबो! चालू सामन्यात रोहितने लगावली पंतच्या श्रीमुखात, पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणतात…

अमृता फडणवीसांचं नवीन गाणं सोशल मिडीयावर घालतंय धुमाकूळ; पहा व्हिडीओ

गॅस सिलेंडर धारकांना आणखी एक झटका! सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ