मुंबई | बॉलिवूड तारका शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हीचा पती आणि व्यावसायीक राज कुंद्रा (Businessman Raj Kundra) अश्लील व्हिडिओ चित्रिकरण (Pornography) प्रकरणी मागील काही काळापूर्वी चर्चेत आला होता.
या प्रकरणात त्याला अटक देखील करण्यात आली होती. सध्या तो त्या प्रकरणात जमिनावर बाहेर आहे. आता त्याने मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात (Mumbai Magistrate Court) याचिका दाखल केली आहे.
सदर याचिकेत त्यांने मोबाईल अॅपद्वारे (Mobile Application) अश्लील चित्रपट बनविने आणि त्याचे वितरण करणे या प्रकरणांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गतवर्षी कुंद्राला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचे वकील प्रशांत पाटील (Prashant Patil) यांनी त्याच्यावतीने त्याला दोषमु्क्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
प्राप्त माहितीनुसार कुंद्राने या कथित प्रकरणात कोणत्याही प्रकारची आर्थिक मिळवणूक केली नाही. किंवा त्याला त्यातून नफा झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नाहीत.
पोलिसांकडे कोणताही पुरावे नसल्याचे कुंद्रा यांनी याचिकेत म्हंटले आहे. तसेच फिर्यादी पक्षाने कुंद्रा याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी आरोप लावलेला नाही, असे देखील याचिकेत म्हंटले आहे. या वादग्रस्त याचिकेवर न्यायालयाने फिर्यादी पक्षाला 8 सप्टेंबर रोजी आपला जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहे.
या प्रकरणात सिनेतारका आणि कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिची सुद्धा चौकशी करण्यात आली होती. राज याच्या मुंबईतील कार्यालय आणि जुहू येथील बंगल्यावर पोलिसांनी छापे टाकले होते.
कुंद्रा याच्या विरोधात गतवर्षी एका महिलेने गंभीर आरोप केले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. हे प्रकरण प्रथम मुंबई गुन्हे शाखेकडे (Mumbai Crime Investigation Department) देण्यात आले. त्याच्यावर विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले.
महत्वाच्या बातम्या –
राज्यात विविध अशा 75,000 पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर वृत्त
दिल्लीत ऑपरेशन लोटस?; आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्काच्या बाहेर
उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, “भाजप पक्ष नाही तर…”
मुंबई एसी लोकल आंदोलन: प्रवाशांसाठी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआय तपासात नवीन माहिती समोर