औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या वादग्रस्त आणि विनोदी भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मागील महिन्यात त्यांनी अनेक सभा घेतल्या होत्या.
यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या विषयावर मोठे रान उठविले होते. तसेच शिवसेेनेच्या बंडानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांची भेट देखील घेतली होती.
आता त्यांना औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी नोटीस बजावली आहे. औरंगाबादेत राज ठाकरे यांनी एक सभा घेतली होती. त्यावेेळी त्यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले होते.
औरंगाबदेत सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर त्यांनी 1 मे रोजी सभा घेतली होती. मात्र यावेळी त्यांना पोलिसांंनी घालून दिलेल्या नियम आणि अटी-शर्तीचा त्यांनी भंग केला. त्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
त्यांनी पोलिसांच्या सभेविषयी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.
या संबंधित गुन्ह्याचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून, त्यासाठी ठाकरेंना हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठविली आहे.
महत्वाच्या बातम्या –
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने कोर्टात दाखल केली याचिका
राज्यात विविध अशा 75,000 पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर वृत्त
दिल्लीत ऑपरेशन लोटस?; आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्काच्या बाहेर
उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, “भाजप पक्ष नाही तर…”
मुंबई एसी लोकल आंदोलन: प्रवाशांसाठी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय