“उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”

मुंबई | एकनाथ शिंदे व शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसेना धर्मसंकटात सापडली आहे. आमदारांपाठोपाठ अनेक आजी-माजी नगरसेवक व जिल्हाप्रमुख देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेना दुभंगली.

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. यात विश्वास ठेवण्यासारखं काही नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. मला त्या लोकांबद्दल वाईट वाटत आहे पण तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

अख्ख्या देशाला, महाराष्ट्राला माहिती नाही इतक्या जवळून आपण उद्धव ठाकरेला ओळखत असल्याचा दावाही राज ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं असताना शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. यावर देखील राज ठाकरेंनी स्पष्ट मत दिलं आहे.

दरम्यान, असा कोणताही प्रस्ताव अद्याप शिंदे गटातून आला नाही. मात्र, असा काही प्रस्ताव आला तर नक्की विचार करू, असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”

मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा मृत्यू

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रकरणांचे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढले

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”