‘मनसे या दोघांचा बंदोबस्त लवकर करेलच’; राज ठाकरेंचं पत्र चर्चेत

मुंबई | आज राज्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन (Marathwada Muktidin) साजरा होत आहे तर दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात हैद्राबाद मुक्तीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते औरंगाबादमधील एका कार्यक्रमात ध्वजारोहन देखील करण्यात आले. त्यानंतर ते मोठ्या कार्यक्रमासाठी हैद्राबादला (Hyderabad) निघून गेले.

शिवसेना मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला कमी वेळ दिला म्हणून त्यांच्यावर टीका करत आहे. तर दुसरीकडे मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जनतेला उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. यात त्यांनी रझाकारचा आणि सजाकार यांचा उल्लेख करत खोचक टोला लगावला आहे.

माझे तर असे म्हणणे आहे की, आता जे नवीन शिक्षण धोरण येत आहे त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा आणि मराठवाडा मु्क्ती संग्रामसाठी लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे.

मराठवाडा मुक्ती संग्रामचा दैदिप्यमान इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी राज ठाकरे यांची एकंदरीत भूमिका आहे. तसेच त्यांनी या दिवसांना सणांसारखे साजरे करण्याचे आवाहन महाराष्ट्राला केले आहे.

गेली कित्येक वर्षे संभाजीनगर (Sambhaji Nagar) (Aurangabad) महापालिकेत जे सत्तेत आहेत त्यांना ठाकरे यांनी सजाकार म्हंटले आहे. ठाकरे म्हणतात, संभाजीनगरच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत, तर आधुनिक सजाकार देखील बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; अटक होण्याची शक्यता

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, दिल्लीच्या पातशहांच्या…

लहानग्यांसाठी खूशखबर; पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी गृहपाठ होणार बंद!

दसरा मेळाव्याला ‘शिवजी पार्क’ सुने सुने राहणार!

WhatsApp वापरणाऱ्यांना मोठा झटका; पुढील महिन्यापासून ‘या’ फोनमध्ये नाही चालणार WhatsApp