‘सैराट’मधील प्रिन्स अडचणीत; अटक होण्याची शक्यता

मुंबई | सैराट (Sairat) या मराठी चित्रपटातून अनेक बालकलाकार आणि नव्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घातली आहे. या चित्रपटाला आता सहा वर्षे होतील पण त्याची मोहिनी अद्यापही रसिकांच्या मनावर कायम आहे.

आर्चीच्या भमिकेतील रिंकू राजगुरु (Rinku Rajguru), परश्याच्या भूमिकेतील आकाश ठोसर (Akash Thosar) हे तर गाजलेच पण त्यांच्यासोबत थोडी नकारात्मत छटा असलेली भूमिका साकारणारा प्रिन्स (Prince) म्हणजे सूरज पवार (Suraj Pawar) देखील प्रेक्षकांना आवडला होता.

सूरज पवार हा नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळतो, असा त्याच्यावर आरोप झाला आहे. मंत्रालयात नोकरीचे अमिष दाखवून शिर्डीतील एका व्यक्तीला फसविल्याचा आरोप सूरजवर झाला आहे.

याप्रकरणी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांना तिघांना अटक केली आहे. तसेच सूरज पवारला देखील अटक होण्याची शक्यता आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर (Mahesh Waghadkar) यांना मंत्रालयात नोकरी देतो, असे सांगून दोघांनी त्यांच्याकडून पैसे उकळले होते. त्यांच्याकडून पाच लाखांची मागणी केली होती.

नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला दोन लाख असा व्यवहार करण्यात आला होता. वाघडकर हे पैसे देण्यासाठी गेले असता, त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे समजले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

दत्तात्रय क्षिरसागर (नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कटात सूरज पवार याचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. राहुरी पोलिसांकडून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सूरज पवार याने फँड्री (Fandry) चित्रपट आणि पिस्तुल्या या लघुपटातून देखील अभिनय केला होता.

महत्वाच्या बातम्या –

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड; म्हणाले, दिल्लीच्या पातशहांच्या…

लहानग्यांसाठी खूशखबर; पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी गृहपाठ होणार बंद!

WhatsApp वापरणाऱ्यांना मोठा झटका; पुढील महिन्यापासून ‘या’ फोनमध्ये नाही चालणार WhatsApp

दसरा मेळाव्याला ‘शिवजी पार्क’ सुने सुने राहणार!

Electric Vehicles घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर