राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहराध्यक्ष सुनील ईरावर यांनी आपला जीवनप्रवास संपवण्याचा मोठा निर्णय घेतला. सुनील यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हे सर्व खूप जिव्हारी लागलं आहे. ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे. अशातच ठाकरेंनी सुनील ईरावर यांच्या घरी फोन लावत त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. याबाबत लोकमतने वृत्त दिलं आहे.

सुनील ईरावर यांची सुसाईड नोट- 

जात आणि पैसा दोन्ही माझ्याकडे नाही ...

राज ठाकरे यांनी ईरावर यांच्या घरी फोन लावला तेव्हा त्यांचं आणि सुनील ईरावर यांचे भाऊ अनिल ईरावर यांच्यातील झालेलं संभाषण…

 राज ठाकरे-हॅलो

अनिल ईरावर-हॅलो, अनिल बोलतोय

राज ठाकरे -जय महाराष्ट्र, राज ठाकरे बोलतोय

अनिल ईरावार -जय महाराष्ट्र साहेब, साहेब तुमचा वाघ गेला..खूप प्रेम करायचा तुमच्यावर.

राज ठाकरे – पण काय झालं त्याला अचानक?

अनिल ईरावार-हसत-खेळत होता, काहीच कल्पना नाही, घरी भांडण नाही

राज ठाकरे-मग काय झालं त्याला?

अनिल ईरावार– अचानकच, कोणतं टेन्शन होतं काही माहिती.

राज ठाकरे-कसलं टेन्शन? माझ्याशी बोलायचं तरी.

अनिल ईरावार-मला खूप वेळा बोलला, साहेबांना भेटलो माझी किस्मत मोठी खूप भाग्यवान आहे.

राज ठाकरे-घरी कोण कोण असतं?

अनिल ईरावार – आम्ही सगळे एकत्रित कुटुंबात राहतो, 4 भाऊ,वहिनी, आताच एो झाली होती.

राज ठाकरे-काळजी घ्या, काही दिवसांनी मी स्वत: घरी येईन भेटायला.

वरील संभाषाणानुसार राज ठाकरे सुनील ईरावर यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंनी आत्ता काही वेळापुर्वी एक पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं की,  तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका.

अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले 14 वर्ष आपण हा संघर्ष करत असल्यचं म्हणत ठाकरेंनी इतर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही… तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर त्याचा मला जास्त त्रास होईल”