“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्योरोप हात आहेत. त्यासोबतच सुशांतच्या प्रकरणाची चौकशी चालू आहे यात रोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. पोलीस तपासात अनेकांनी धक्कादायक असे जबाब आहेत अशातच सुशांतकडे आधी कामाला असणाऱ्या मॅनेजर अंकितने सुशांतच्या स्टाफवर गंभीर आरोप केला आहे.

सुशांतला त्याच्याच स्टाफने मारलं आहे. सुशांत स्वत: इतकं मोठं टोकाचं पाऊल कधीच उचलू शकत नाही. कारण ते एक सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्य जगणारा असल्याचं अंकितने म्हटलं आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत अंकित बोलत होता.

मी गेल्यानंतर दीपेशला सुशांतकडे कामावर ठेवण्यात आलं होतं. सुशांतची देखभाल करणं हे त्याचं काम होतं. सुशांत आपल्या खोलीचा दरवाजा लावत नव्हता आणि जरी लावला तरी स्टाफवाल्यांनी तो दरवाजा का तोडला नाही, असा सवालही अंकितने उपस्थित केला आहे.

दरम्यान, सुशांतने मला लहान भावासारखं मानलं होतं. मी जोपर्यंत त्याच्याकडे काम करत होतो तेव्हा त्याला कधीही निराश नव्हतं पाहिलं. सुशांत आपल्या दिवंगत आईसाठी कविता लिहायचा आणि रडायचा. परंतू त्याच्यासारखी व्यक्ती कधी तणावात जावून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेईल हे होवूच शकत नाही, असं अंकितने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…