…तर मी खासदारकीचा राजीनामा देईन- खासदार सुजय विखे

अहमदनगर | आपल्या राहुरीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी मोठ्या विश्वासाने आणि जबाबदारीने साखर कारखाना आमच्याकडे दिला. या दोन वर्षात काम करत असताना कुणीही मला एक रूपयाचा भ्रष्टाचार केला म्हणून दाखवून दिलं तर मी कारखान्याच्या संचालकपदाबरोबर आपल्या खासदारकीचा राजीनामा देईन, असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दोन वर्ष काम करत असताना मला कारखान्यांच्या सभासदांचं मोठं सहकार्य लाभलं. म्हणूनच 2 हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केले, असं सुजय म्हणाले. ते तनपुरे साखर कारखान्याच्या 64 व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.

यंदाच्या वर्षी तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या उसावर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची नजर आहे, असा टोला त्यांनी लगावला.

गळीत हंगामात उसाबाबत मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्याला नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत ठरली. यंदा डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला, तर ते अडचणीचे ठरू शकते, असं सुजय विखे म्हणाले.

चांगला पाऊस असल्याने पुढील गळितासाठी राहुरीच्या कार्यक्षेत्रात 14 लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध राहणार असल्याने पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात गाळप करून तनपुरे कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

महत्वाच्या बातम्या-