मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. आमदारांपाठोपाठ अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुखांनीही शिवसेनेकडे पाठ फिरवत शिंदे गटाचा रस्ता पकडला.
शिवसेनेतील या बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरत आहेत. त्यामुळे सध्या सेनेसह उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
शिवसेना फुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं आजच्या परिस्थितीचं फुकटचं श्रेय घेऊ नका, असं म्हणत राज ठाकरे हसायला लागले.
जी गोष्ट आज घडली आहे ती ना तुम्ही घडवली, ना अमित शहांनी, ना भाजपनी किंवा अजून कोणी. याचं श्रेय म्हटलं उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागले, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
शिवसेना फुटली याचं श्रेय हे फक्त उद्धव ठाकरेंचच आहे, असा मिश्किल टोला राज ठाकरेंनी लगावला. तर यावेळी राज ठाकरेंनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या-
उरल्या सुरल्यांचं काय ऐकायचं म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…
“उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही”
“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”
मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा मृत्यू
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रकरणांचे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढले