शिवसेनेच्या ‘दसरा मेळाव्या’वरुन राज ठाकरे यांचे ट्विट चर्चेत

मुंबई | शिवसेना आणि शिंदे गटाचे वाद आता दिवसेंदिवस चिघळत आहेत. येत्या महिन्यात दसरा आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दादर येथील शिवाजी पार्क मैदानात ‘दसरा मेळावा’ होणार आहे.

पण यावेळी दसरा मेळावा कोणी घ्यावा, यावर शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची चढाओढ सुरु आहे. या वादात आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा म्हणजे, बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे, आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरुन घमासान सुरु आहेत. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ‘वारसा हा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो’, असे ट्विट राज ठाकरेंकडून करण्यात आले आहे.

शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आपला अधिकार सांगितला आहे. तसेच त्यांनी मुंबईत एक प्रति शिवसेनाभवन उभारण्याची देखील तयारी दाखविली आहे.

त्यामुळे आगामी दसरा मेळावा कोणी घ्यावा, हा वाद उतपन्न झाला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी या दोघांच्या वादावर आपले मत दिले आहे. काल (दि. 29) रोजी
त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली.

मनसेने गेले काही दिवस हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्य हिंदुत्वाचे खरे वारसदार आम्हीच आहोत, अशा स्वरुपाची कामे आणि धोरणे मनसेकडून गेले काही दिवस सुरु आहेत.

मनसे शिवसेना आणि शिंदे यांच्या भांडणाचा लाभ घेणार का, आणि शिवसेनेला आपला पक्ष पुन्हा एकदा बांधता येणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आगामी मुंबई आणि पुणे महानगरपालिका निवडणुकांत मिळतील.

महत्वाच्या बातम्या – 

शरद पवार आक्रमक, ‘या’ कारणांमुळे नरेंद्र मोदींना सुनावले खडे बोल

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; शौमिका महाडिक म्हणाल्या, “सत्ताधारी लोक…

नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दणका

सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची संगत का नको? जाणून घ्या कारणे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; अमोल मिटकरी यांचे खळबळजनक भाकीत