शरद पवार आक्रमक, ‘या’ कारणांमुळे नरेंद्र मोदींना सुनावले खडे बोल

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात आहेत. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

त्याठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि नंतर पत्रकार परीषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपशासीत केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी भाजपला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली.

पवारांनी बिल्किस बानो (Bilkis Bano) आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर आदी मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले. तसेच केंद्रातील भाजपने 2014 साली सत्तेत येताना ‘अच्छे दिन’ आणि महागाईचा नायनाट, अशा घोषणा केल्या होत्या, त्यांची आकडेवारी जाहीर केली.

नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन 100% पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी भाजपच्या 2014 सालच्या निवडणूक मॅनिफिस्टोची (Election Manifesto) भाजपला आठवण करुन दिली.

महिला अत्याचारांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरण सर्व देशाला माहित आहे. त्या प्रकरणातील आरोपींना जन्मठेप झाली. ही जन्मठेप आजन्म होती.

असे असताना देखील त्यांची सुटका करण्यात आली. तसा निर्णय घेऊन त्यांना सोडण्यात आले आणि त्यांना नुसते सोडले नसून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या गोष्टीचे मला आश्चर्य वाटते, असे पवार म्हणाले.

स्वातंत्र्य दिनाचे नरेंद्र मोदींचे भाषण मी एकले, यावेळी त्यांनी देशातील महिलांना सन्मान देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. ते ज्या राज्यातून येतात, त्याच राज्याने बिल्किस बानो प्रकरणातील आरोपिंना सोडले, असे देखील पवार म्हणाले.

दुसरीकडे भाजप केंद्रीय संस्थांचा वापर करुन भाजपेत्तर राज्यांतील सरकारे पाडण्याचा, त्यांना त्रास देण्याचा कार्यक्रम राबवित आहे, असा देखील आरोप पवारांनी केला. यावेळी भाजच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावर पवारांनी बोट ठेवले.

महत्वाच्या बातम्या – 

गोकुळच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; शौमिका महाडिक म्हणाल्या, “सत्ताधारी लोक…

नोएडातील ट्विन टॉवर पाडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना मोठा दणका

सत्ताधाऱ्यांना शरद पवारांची संगत का नको? जाणून घ्या कारणे

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल; अमोल मिटकरी यांचे खळबळजनक भाकीत

गणेश भक्तांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांनी दिले नवे आदेश