“अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…”, मनीषा कायंदेंची खोचक टीका

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहरी हिंदूत्वाची शाल पांघरल्यानंतर आता मनसे आणि भाजप यांच्यात युतीचे संकेत मिळाले आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळाल्यानंतर आता राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

राज ठाकरे येत्या 5 तारखेला अयोद्ध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता ज्वलंत हिंदूत्वाचा राजयोग अयोध्येत पहायला मिळणार आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतूक केलं आहे.

उत्तर प्रदेशातील धार्मिकस्थळांवरील आणि विशेषत: मशिदींवरील भोंगे उतवरल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका देखील केली आहे.

आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी, असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी योगी आदित्यनाथ आणि राज ठाकरे यांची भेट होणार असल्याचं देखील समोर आलं आहे.

अशातच आता अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. मस्जिदच नव्हे तर मंदिरावरीलही अनधिकृत भोंगे योगी यांनी उतरवले आहेत, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनीषा कायंदे यांनी व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सिक्सर किंग युवराज सिंहने दिला लाडक्या विराटला सल्ला, म्हणाला…

‘माझ्यावरील हल्ल्याची CBI चौकशी करा’; किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात धाव

“राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राज्यात…”, एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…

हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…