मोठी बातमी! बेरोजगार तरुणांसाठी ठाकरे सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई | राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे सरकारने (Government ) एक मोठा निर्णय घेतला आहे.

बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळेपर्यंत त्यांच्या किमान गरजा भागवण्यासाठी त्यांना दरमहा रुपये 5,000 आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

रोजगार नसलेली परंतु रोजगार मिळावी अशी इच्छा असलेली व्यक्ती रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करूनही रोजगार न मिळालेली व्यक्ती. यांनाच पैसे मिळतील.

बेरोजगार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 40 वर्षापेक्षा अधिक नसावं.

भत्ता मिळणाऱ्या प्रत्येक बेरोजगार व्यक्तीनी नोकरी मिळाल्यानंतर त्वरित तालुक्यातील/ जिल्ह्यातील बेरोजगारी भत्ता शाखेला कळवलं पाहिजे. त्यानंतर हा भत्ता बंद करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या बेरोजगार व्यक्तीला 5,000 रुपये फक्त एवढ्या रकमेचा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल, अशी माहिती समोर आलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…”, मनीषा कायंदेंची खोचक टीका 

सिक्सर किंग युवराज सिंहने दिला लाडक्या विराटला सल्ला, म्हणाला…

‘माझ्यावरील हल्ल्याची CBI चौकशी करा’; किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात धाव

“राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राज्यात…”, एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…