सिक्सर किंग युवराज सिंहने दिला लाडक्या विराटला सल्ला, म्हणाला…

मुंबई | भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खराब कामगिरीनंतर आयपीएलमध्येही त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. विराटच्या खराब फॉर्ममुळे अनेकजण चिंतेत आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट दोनवेळा गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे आता विराटच्या चाहत्यांनी त्याला धीर देण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीने क्रिकेटमधून दीर्घकाळ विश्रांती घ्यावी, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गज क्रिकेटर्सने विराटला सल्ले दिले आहेत.

अशातच आता टीम इंडियाचा वर्ल्डकप चॅम्पियन युवराज सिंहने आपल्या लाडक्या विराटला सल्ला दिला आहे. युवराज आणि विराटची दोस्ती सर्वांनाच माहिती आहे. युवराजने आपला गोल्डन बुट विराटला दिला होता.

युवराज सिंग म्हणाला की, कोहलीने फॉर्ममध्ये येण्यासाठी त्याचे जुने सामने पाहावेत. त्याला त्याची जुनी खेळी पाहून शिकता येईल की त्याला पुन्हा मोठ्या खेळी कशा खेळायच्या आहेत.

आम्ही नक्कीच ते आनंदी नाहीत आणि लोकही आनंदी नाहीत. कारण आपण त्यांना मोठी ध्येये ठेवताना पाहिलं आहे. त्यांनी शतकांमागून शतके झळकावली, पण मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत असं घडतं, असंही युवराज म्हणाला आहे.

दरम्यान, जुने सामना पाहून विराटचा आत्मविश्वास वाढू शकतो, असं युवराजचं मत आहे. त्यामुळे आता विराटचा फाॅर्म परत येणार का?, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘माझ्यावरील हल्ल्याची CBI चौकशी करा’; किरीट सोमय्यांची उच्च न्यायालयात धाव

“राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राज्यात…”, एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…

हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…

रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली