“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केल्याचं पहायला मिळालं.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची फेरी लगावल्यानंतर आता मुंबई पोलीसांनी सोमय्यांना समन्स बजावला आहे. यानंतर सोमय्यांनी पोलीस ठाण्यात हजेरीही लावली.

संजय राऊत सोमय्यांवर वारंवार आरोप करत आहेत. त्यामुळे आता किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेत या आरोपांचं खंडण करणार आहेत.

सोमवारी 21 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर देऊ, असा इशाराच सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे आता सोमय्या पत्रकार परिषदेत काय नवे खुलासे करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सोमय्या यांनी पत्रकार परिषदेचा इशारा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच चिघळत चालल्याचं पहायला मिळतंय.

आपण उद्या आणखी घोटाळे जाहीर करु, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले की, “उद्धव साहेब, सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे”.

शिवसेना आणि भाजपमध्ये रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

अलिबागमधील 19 बंगल्यांवरुन किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे. यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तरही दिलं आहे. आता सोमय्या पत्रकार परिषद घेऊन आरोपांंवर बोलणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना

  ‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’

  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका

“देशात असे चु… भरपूर आहेत, जे 2024 नंतर दिसणार नाहीत”