‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं पण…’, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

मुंबई | एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांनी बंडळी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. सत्तापालट होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

ऐनवेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारल्याबद्दल राज ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं परंतू ते व्हायचं नव्हतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

पक्ष आणि पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधिलकी म्हणजे काय असतं याचा वास्तुपाठच आहे, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांंनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखं आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे.

ही बढती आहे की अवनती यात मला जायचं नाही. मात्र, धनुष्यातून ध्येयाचा वेग घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावी लागते. या ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, देशाच्या भल्यासाठी तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आईजंगदबेकडे प्रार्थना, असं म्हणत राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘हात जोडून विनंती आहे माझ्यावरचा राग…’, शिंदे सरकारला उद्धव ठाकरेंचं जाहीर आवाहन

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…

“बिचारे देवेंद्र फडणवीस…, केंद्राने त्यांचा शंकरराव चव्हाण केला”

‘तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा’; नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी