राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

मुंबई | राज्यात भोंग्याचा मुद्दा जरा जास्तच आवाज करत असल्याचं दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात सध्या गदारोळ सुरु झाला आहे.

भोंग्याचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातच नाहीतर याचे पडसाद संपूर्ण देशभरात पडताना दिसत आहे.

भोंगे प्रकणावरुन आता राज ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. जनतेला लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास उद्युक्त केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या मागणीच्या याचीकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे राज यांच्या अडचणी वाढू शकतात.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा कमालीचा उचलून धरला आहे. सध्या याचेच पडसाद संपर्ण देशभर पडताना दिसत आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादीनं भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसेला चांगलंच घेरल्याचं पहायला मिळालं. फक्त सत्ताधारीच नाहीतर विरोधी पक्ष भाजपच्या काही नेत्यांनीही मनसेला लक्ष केल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मी भाजपसोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही”

  कोरोनामुळे देशात ‘इतक्या’ लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या दाव्यानं खळबळ

  “राज ठाकरेंच्या मनसे बरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही”

  “राज ठाकरेंना भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच भोंग्याचा त्रास सुरू झाला”

 भोंग्याच्या वादावर केंद्रीय मंत्र्याची राज ठाकरेंवर जोरदार टीका, म्हणाले…