राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला अल्टीमेटम, म्हणाले “येत्या 3 मे पर्यंत…”

ठाणे | गुडीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाण्यात आज उत्तर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं, अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवली.

3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

दरम्यान, प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा रस्त्यावर आणू नये. मी अजून बाण काढला नाही, मला काढायला लावू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’; अजित पवारांवर सडकून टीका

“शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार, हे इंटेलिजन्सला कळलं कसं नाही?”

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!