“माझ्या नादाला लागण्याचं नाही, असे 100 जण तंगड्याला…”, चित्रा वाघ कडाडल्या

मुंबई | शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक प्रकरणाला वेगळ वळण लागलेलं आहे. या प्रकरणातील पीडीत तरूणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलेलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली होती.

लाचखोरी रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्यांकडून कोणती अपेक्षा करणार?, असा खोचक सवाल मेहबुब शेख यांनी केला होता.

महिलांच्या रक्षक म्हणून सांगणाऱ्या स्वत:च महिलांच्या भक्षक आहेत. ही गोष्ट गंभीर आहे. असल्या डबल ढोलकी व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात आली पाहिजे, असं  मेहबुब शेख यांनी म्हटलं होतं.

मेहबूब शेख यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्याला म्हणावं तुझं चामडं सांभाळ. ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे ते तु सांभाळ, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता.

हे प्रकरण गंभीर आहे. त्यात बलात्काऱ्यांनी चोमड्यासारख बोलू नये. आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय. फेब्रुवारीपासून ती पोरगी लढत आहे. तेव्हा सगळे झोपले होते. काय म्हणू याला भाईजान, आता त्याला तिची कड आलीय ज्यावेळेस ती माझ्या विरोधात बोलली, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

असे 100 जण तंगड्याला फिरते रोज चित्रा वाघ, माझ्या नादाला लागण्याचं काम अजिबात करायचं नाही, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ती मुलगी एकटी लढत होती. तिच्या एकटेपणाच्या गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. मदत करणं ही जर चुक असेल तर ती चुक मी केली आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!

“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं

“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत?”