राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत दिली महत्वाची माहिती, म्हणाले ‘जानेवारी अखेरपर्यंत ही लाट…’

मुंबई | देशात आणि जगभरातच ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. दररोज कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) नवे रेकॉर्ड बनवत आहे. अशात आता महामारीबाबत हे नवीन वर्ष 2022 कसं असणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण असून लॉकडाऊनची (lockdown) शक्यता वर्तवली जात आहे. पण कोरोनाची तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावं, असंही टोपे म्हणालेत.

‘जान है तो जहान है’ असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणंही महत्वाचं आहे असं म्हणत टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तरं दिलं.

राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावेत, असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.

1लाख 54 हजार ऑक्सिजन बेड पैकी 5 हजार 400 बेड दिले गेलेलं आहे. हे जे प्रमाण आहे यावरून स्पष्ट होते की, आपल्या इन्फ्रास्ट्रकचर वर काहीच ताण आलेला नाही, ही बाब केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्या आहे. बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“शिवसेना-भाजपमध्ये युती होईल, भाजपने मन मोठं करून…

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत अचानक घट, मात्र धोका कायम; वाचा आजची ताजी आकडेवारी </a

 सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा! पेरूच्या उत्पादनातून कमावले लाखो रूपये

48 चा झाला बड्डे बाॅय ऋतिक, जाणून घ्या पिळदार शरीराचं सिक्रेट

कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”