राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतो मी पवारांसोबतच राहणार; ‘कोणाच्याही संपर्कात नाही’

मुंबई | विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झालीये. भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची भगदाड दिवसेंदिवस रूंदावत चाललीयेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे घनसावंगीचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीला हायसं वाटणारी प्रतिक्रिया दिली आहे.

मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कुठेही जाणार नाही. उगीचच अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे.

राजेश टोपे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. या चर्चेतली हवा राजेश टोपे यांनी काढून घेतली आहे.

आघाडी सरकारच्या काळात टोपे यांनी मंत्रीपद भूषवलं आहे. त्यांची मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांपैकी गणना होते.

कागलचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील माझं तत्व ‘एकच पवार एके पवार’, मला कितीही ऑफर आल्या तरी मी राष्ट्रवादी सोडणार नाही, असं म्हटलं होतं.

दरम्यान, मुश्रीफ यांच्यानंतर राजेश टोेपे यांनी कोणत्याही परिस्थितीत पक्षांतर करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.


महत्वाच्या बातम्या-

-यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका- शरद पवार

-आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड

-प्रकाश आंबेडकरच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!

-खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकरांचा मार्ग मोकळा??

-“सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगलं वाहन चालवतात”