#Corona | लालबाग गणेश मंडळ पुढे सरसावलं; रक्तदान शिबिराचं केलं आयोजन

मुंबई |  राज्यात 10 ते 15 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गर्दी टाळून आणि अंतर राखून रक्तदान करा, अशी कळकळीची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केली होती. त्यांच्या याच विनंतीला मान देऊन मुंबईतल्या लालबाग गणेश मंडळाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. लालबाग गणेश मंडळाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातल्या इतर मंडळांनीही असे रक्तदान शिबिरांचं आयोजन करावं, असंही आरोग्यमंत्री म्हणाले आहेत.

आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. पण रक्तदान सुरु ठेवा. जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ‘सामाजिक अंतर’ राखून रक्तदान करावं, अशी विनंती टोपेंनी केली आहे. त्यानुसार लालबाग गणेश मंडळाने राज्य शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळत आणि काळजी घेत रक्तदान शिबीर सुरू केलं आहे. (Rajesh tope Visit Lalbaug Ganesh mandal Donation Camp)

ब्लड बँकेमध्ये सध्या रक्त कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर लोकांना रक्ताची गरज भासली तर आवश्यक परिस्थितीत रक्त कमी पडू नये किंवा जनतेला हाल सोसावे लागू नयेत म्हणून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदानाचं आवाहन केलं आहे. तसंच रक्तदान केल्याने कोणताही धोका नाही, असंही त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलं आहे.

दुसरीकडे युवक काँग्रसचे प्रदेशाध्ययक्ष सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे, की जेणेकरून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासणार नाही. तसंच त्यांनी आपापल्या भागांमध्ये रक्तदान शिबिरांचे तातडीने आयोजन करावं, असंही आवाहन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे”

-दुसऱ्या दिवशी घराबाहेर येऊन फिरण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ लावला होता काय?- राज ठाकरेंचा सवाल

-जमावबंदीचे आदेश झुगारुन वाहनांच्या रांगा; यांना नक्की जायचंय तरी कुठं???

-पुणेकरांना आता वाहनेही बाहेर काढता येणार नाहीत, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

-दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक; रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन