सभेआधी उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले ‘असे भोंगेधारी…’

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

असे भोंगेधारी, पुंगाधारी फार पाहिले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली आहे.

अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. कारण असे खेळाडू कोणत्या मैदानांमध्ये कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा, हिंदुत्वाचा खेळ सुरु आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनेतेने पाहिले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

मी शिवेसनेची ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे हे मी विधानसभेतही बोललो आहे आणि ते लपवण्याची गरज नाही. आता काहीजण हे करुन बघू ते करुन बघू बोलत आहेत. सध्या मार्केटिंगचा जमाना आहे. नाही आवडलं तर परत करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दोन वर्षांचा कालखंड फार मोठा होता. यादरम्यान सर्व बंद होतं. मग करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची असंही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपवर तुटून पडा आणि आम्ही घरात बसतो” 

“नाटक, नाटक असतं तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं…” 

“राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागलेत” 

“…तेव्हापासून राज माझ्या मागावर होते”, शर्मिला ठाकरेंंनी सांगितला लग्नाआधीचा किस्सा! 

राज ठाकरेंच्या सभेआधी असुदुद्दीन ओवैसींनी दिला मनसेला सल्ला, म्हणाले…