मी आबांच्या पायवाटेने जातोय, काहींनी माझा बाप काढला पण…- रोहित पाटील

सांगली | राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच सांगलीच्या तीन नगर पंयायतींसाठी आज मतदान होत आहे. कवठेमहांका, कडेगाव आणि खानापूरसाठी सांगलीत मतदान होत आहे. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीला या निवडणुकीत शंभर टक्के यश मिळणार, असा दावा केलाय.

प्रचार काळापूर्वी सुद्धा मी कोरोनाच्या काळात विविध ठिकाणी आणि समाजात उपस्थित राहत होतो. लोकांचा सातत्याने संपर्क होत होता. तसेच वेळोवेळी त्यांच्या अडचणी मी समजून घेत होतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वांना मदत करत होतो, असं रोहित पाटील यांनी सांगितलं.

आज पॅनेलमधून जे उमेदवार उभे केले आहेत. ते सर्वसामान्य घरातले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभी केलेली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्याची काहीही परिस्थिती नसतांना आबांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं, असं रोहित पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं. तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना किमान समान कार्यक्रम कुठेतरी पाळला गेला नाही. परंतु सर्वसामान्य कार्यकर्ते अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेससोबत उभे राहीले. त्यामुळे अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आपण जर निवडणुकीत संधी दिली नाही. तर त्याचा परिणाम पक्षाला होऊ शकतो, असं रोहित पाटील म्हणाले.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात रोहित पाटील(Rohit Pawar) कवठेमहांकाळ नगरपंचायत (Kavathe Mahankal Election) निवडणुकीसाठी प्रचार केला. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे.

निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या प्रचााची सांगता सभा रोहित आर आर पाटील यांनी गाजवल्याचं पाहायला मिळालं. 19 जानेवारीला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, असं रोहित पाटलांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातल्याचं पाहायला मिळालं.

आज मी जे पॅनल निवडलंय, त्यावर सर्वसामान्य लोक म्हणतातय की, तुम्ही आमच्या मनातील पॅनल निवडलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलं आहे, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पाठीत खुपसलेला खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही” 

“सरकारने राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे शिल्लक ठेवली नाहीत” 

काँग्रेसची मोठी खेळी; ‘त्या’ 12 आमदारांना काँग्रेसचा दे धक्का? 

‘लस घेतलेल्या 90 टक्के भारतीयांना….’; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर 

पॉर्नोग्राफी निर्मितीबाबत राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…