पुणे महाराष्ट्र

“पेशवाईची गिधाडं झडप घालण्याच्या तयारीत; आपण वेळीच त्यांना रोखू”

पुणे | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पेशवाईची गिधाडे महाराष्ट्रावर झडप घालण्याच्या तयारीत आहेत, आपण वेळीच त्यांना रोखायला हवं, अशा शब्दात विद्यमान सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुण्यात बहुजन मुक्ती पार्टीचा राज्यस्तरीय मेळावा झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

इंग्रजांपेक्षा आताचे राज्यकर्ते वाईट आहेत, मग त्यापेक्षा इंग्रज बरे… अशी म्हणण्याची वेळ आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

जातीजातींमध्ये भांडणं लावून राज्यकर्ते स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहे. आणि ते देशासाठी घातक आहे. गरिबांची डोकी फोडून रक्ताचा गुलाल करत आहेत, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला.

माझ्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. माझ्यावर कुणी हल्ला केला हे माहिती होतं. पण त्याच्या पाठीमागचा मेंदू वेगळा होता. माझी लढाई ही सूत्रधारांच्या विरोधात आहे, असं शेट्टी म्हणाले.

दरम्यान, कुत्र्याला दगड मारला तर तो कुत्रा दगडाला चावतो, पण वाघाला दगड मारला तर तो वाघ मारणाऱ्याच्या नरडीचा घोट घेतो. माझी बदला घेण्याची पद्धत वेगळी आहे, असंही शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“चित्रा वाघ यांनी पक्षात राहून पक्षाचं नुकसान केलं; आम्हीच हकालपट्टी करणार होतो”

-चित्रा वाघ आणि सचिन अहिर यांच्या राजीनाम्यावर मेहबूब शेख यांची आक्रमक प्रतिक्रिया!

-‘होय, मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम

-या 20 दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली तर हे 9 जण धक्का देण्याच्या तयारीत!

-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

IMPIMP