मुंबई | भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. भाजप 144, शिवसेना 126 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदल केले गेले असल्याचं कळतंय.
शिवसेना आणि भाजपने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण येत्या रविवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसोबतच आयारामांना तिकीट देण्याची तजवीजही भाजपला करावी लागणार आहे.
राज्यातील उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपची दिल्लीत बैठक होत आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या बैठकीला उपस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या-
रविकांत तुपकरांच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टी म्हणतात… https://t.co/4dDt5Zp4bK @rajushetti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
काँग्रेस राष्ट्रवादीपाठोपाठ आता राजू शेट्टींनाही मोठा धक्का; या नेत्याचा पक्षाला रामराम https://t.co/nXqB0hmWYv @rajushetti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019
जितेंद्र आव्हाड म्हणतात… आम्ही पवार साहेबांचं ऐकणार नाही! https://t.co/KCqAWNBwMw @Awhadspeaks @ThaneNCP @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 26, 2019