नवी दिल्ली | सुप्रसिद्ध एकपात्री विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Shriwastav) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी हृद्यविकाराचा झटका आला होता.
बुधवारी ते व्यायमशाळेत व्यायाम करत असताना, त्यांना अचानक हृद्यविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने ते जमीनीवर कोसळले. त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. परंतु त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नसल्याचे वृत्त आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हृद्यात शंभर टक्के ब्लॉकेज आढळले आहेत.
त्यांच्या हृद्यातील शंभर टक्के ब्लॉकेजमूळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तसेच करण्यात येणाऱ्या उपचारांना ते साथ देत असल्याने त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
बुधवारी श्रीवास्तव ट्रेडमिलवर धावत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या छातीत प्रचंड वेदना जाणवल्या आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरु झाले.
राजू श्रीवास्तव हे उत्तम विनोदवीर आहेतच. त्यांचप्रमाणे ते राजकारणात देखील सक्रीय आहेत. 2014 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांना समाजवादी पक्षातर्फे (Samajvadi Party) कानपूरमधून उमेदवारी दिली होती.
त्यांनी त्यांच्या उमेदवारीमधून माघार घेतली होती. कारण त्यांना पक्षाचे स्थानिक लोक पाठिंबा द्यायला तयार नव्हते. त्यानंतर त्यानी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. ते नरेंद्र् मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात करतात.
महत्वाच्या बातम्या –
केंद्र सरकारची “हर घर तिरंगा” योजना वादात; वरुण गांधींचा मोंदींना घरचा आहेर…
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, महत्वाची माहिती समोर…
नवीन मंत्रिमंळावर किशोरी पेडणेकर आक्रमक; केली आरोपांची मालिका…
“नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी आमनेसामने येणार?”
“महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना लफडी बाहेर काढली आणि आता मंत्रिपदं दिली”