केंद्र सरकारची “हर घर तिरंगा” योजना वादात; वरुण गांधींचा मोंदींना घरचा आहेर…

मुंबई | भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात (75th Anniversary of Independence) पदार्पन करत आहे. त्यानिमित्ताने देशात केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ योजना राबविली आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशाच्या नागरिकांना केले आहे.

त्यासाठी पोस्ट ऑफिस आणि शिधा वाटप केंद्रावर (Ration Shop) तिरंगा कमी किंमतीत विकत मिळणार आहे. तो प्रत्येकाने घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे गरिबांना हा जुलूम असल्याचे वाटत आहे.

आता भाजपच्या नेत्यानेच आपल्या पक्षाच्या या आदेशाला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी त्यासंदर्भात एक ट्विट केले आहे. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन गरिबांच्या अंगावर भार टाकणार ठरत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी सक्तीने झेंडा (तिरंगा) खरेदीवर आक्षेप घेतला आहे. देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन देशातील गरिबांवर भार टाकणार ठरला, तर ते देशाचे सर्वात मोठे दुर्दैव आहे, असे वरुण गांधी म्हणाले आहेत.

शिधा वाटप केंद्रावर म्हणजे रेशन दुकानांवर वीस रुपयांना हा झेंडा घेणे सक्तीचे केल्याने गरिबांना नाहक त्रास होत असल्याचे गांधी यांनी म्हंटले आहे. त्यांनी शिधावाटप केंद्रावर झेंडा सक्ती केली जात असल्याचा एक व्हिडिओ टाकला आहे.

जर तिरंगा खरेदी केला नाही, तर त्यांना धान्य दिले जात नाही आहे. एका व्हिडिओमधून अशा स्वरुपाची तक्रार केली जात आहे. झेंडा खरेदीवर बळजबरी केली जात असल्याने त्यांनी या प्रकाराला विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

राजू श्रीवास्तव यांची प्रक्रुती चिंताजनक, महत्वाची माहिती समोर…

नवीन मंत्रिमंळावर किशोरी पेडणेकर आक्रमक; केली आरोपांची मालिका…

“नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी आमनेसामने येणार?”

“महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना लफडी बाहेर काढली आणि आता मंत्रिपदं दिली”

निवडणुक आयोगाचा शिवसेनेला मोठा दिलासा…