सेटवर राखीला चावला कुत्रा, राखी म्हणतेय मी देखील त्याला चावणार; पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. राखी नेहमीच माध्यमांशी दिलखुलासपणे संवाद साधत असते. ती आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी पॅपराजींबरोबर शेअर करत असते.

राखीच्या या बिनधास्त वागण्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या देखील जास्त आहे. राखी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसते.

अशातच आता राखीने माध्यमांशी संवाद साधतानाचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. राखी नुकतीच ‘बिग बॉस’ शोमध्ये गेली होती.

यावेळी बिग बॉसच्या सेटवर राखीला एक कुत्रा चावला. हीच गोष्ट राखी तिच्या मजेशीर शैलीमध्ये पॅपराजींना सांगताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुत्रा आपल्याला चावल्याने आपण देखील त्याला चावणार असल्याचं राखी बोलते.

यावेळी राखी म्हणते की, मी बिग बॉसच्या सेटवर गेले होते. सेटवरून घरी जात असताना सेटवरील एक कुत्रा मला चावला. यामुळे आता मी दोन दिवस पूर्ण विश्रांती घेणार आहे.

तसेच माझ्याबरोबर काय घडत आहे हेच मला समजत नाही. परंतु यावेळी कुत्रा मला चावला पुढच्यावेळी मी देखील त्याला चावणार. मला आता इंजेक्शन घ्यावी लागतील काय, असा सवाल राखी यावेळी पॅपराजींना करते.

यावर उत्तर देताना एकजण राखी तुम्हाला इंजेक्शन घ्यावी लागतील, असं बोलतो. यानंतर राखी म्हणते की, आयुष्यच खराब झाले आहे. कधी लसीचे इंजेक्शन घ्या. कधी व्हिटॅमिनचे घ्या. कधी कुत्रा चावल्याने इंजेक्शन घ्या. इंजेक्शन घेता घेता आता मीच एक इंजेक्शन झाले आहे.

दरम्यान, राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही लोक याला भरभरून प्रेम दर्शवत आहेत तर काही लोक यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/tv/CS_jyhTnpkN/?utm_source=ig_embed&ig_rid=b63d6348-1664-4af8-82e0-e47b80b59c46

महत्वाच्या बातम्या –

रिंकू राजगुरुचा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

कोरोना काळात ‘अशी’ वाढवा लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती!

खासदार नुसरत जहाँच्या घरी चिमुकल्याचं आगमन!

कोरोनाच्या भीतीनं चक्क माकडानंही लावला मास्क, पाहा व्हिडीओ!