मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ डान्सचे असतात. तर काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर काही खूपच धक्कादायक, त्यांना पाहिलं तर अंगावर काटा उभा राहतो.
सध्या सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच बॉलिवूडची ड्रामा क्विन आणि अभिनेत्री राखी सावंत कोणत्याना कोणत्या विषयावरून नेहमीच चर्चेत असते. आताही ती एका तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.
नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो ‘वूट’ या अॅवर सुरू झाला आहे. यामध्ये बऱ्याच बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींनी सहभाग घेतला आहे. या शोचे सूत्रसंचालय सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर करत असून, हा शो संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात खूप लोकप्रिय होत असल्याचंही समजतं आहे.
आता बिग बॉस ओटीटी या शोमध्ये बिग बॉस सीझन 14 मध्ये आपल्या बोलण्याच्या स्टाईलने सगळ्याच्या मनावर छाप पाडणाऱ्या राखी सावंतला सहभाग घ्यायचा आहे.
यासाठी तिने दरवेळीप्रमाणे याहीवेळी एक वेगळा आवतार धारण केला आहे. शोमध्ये प्रवेश करण्यासाठी राखीने स्पायडर मॅनचा पोशाख घातला आहे.एवढंच नाहीतर स्पायडर मॅनचा पोशाख घालून तिने रस्त्यावर डान्सही केला आहे. तिचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
स्पायडर मॅनच्या पोशाखाबरोबरच तिने मेकअपही केला असून गळ्यात सोनेरी रंगाच्या दोन मोठं-मोठ्या माळाही घातल्या असल्याचं दिसून येतं आहे. ती रस्त्यावर एका हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. हे पाहून तिच्या अवती-भोवती असलेली लोक तिच्याकडं पाहून हसत आहेत. परंतू तरीही राखी आपल्या जगातच असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
राखीचा हा व्हिडीओ ‘बॉलिवूड फॅक्ट्स’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. राखीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला खूप लोकांनी लाईकही केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
लस घेतानी तरूणाने जे केलं ते पाहून नर्सही झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ
…म्हणून आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय; पोस्ट शेअर करत मलायकाने व्यक्त केली भावना
खूशी कपूरने आपल्या ‘या’ लूकने चाहत्यांना पाडली भुरळ, पाहा व्हायरल फोटो
‘कृपया तो व्हिडीओ शेअर करू नका’; जोडीदारासोबतचा खासगी MMS लीक होताच अभिनेत्री त्रस्त