“फक्त झेंड्याचा रंग बदलून चालणार नाही तर मनसैनिकांनी त्यांची मनं देखील बदलली पाहिजेत”

रत्नागिरी | मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा जर मनसेनं सोडला तर मनसेचं अस्तित्व संपून जाईल, असं आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मनसेने येत्या 23 जानेवारीला महाअधिवेशन बोलावलं आहे. यापार्श्वभूमीवर मराठी माणसाच्या भूमिकेवर रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. तसेच मनसेनं कितीही प्रयत्न केले किंवा भूमिका बदलली तरी मनसेला त्याचा राजकीय फायदा होणार नाही, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

झेंडा कोणता घ्यायचा तो अधिकार राज ठाकरेंना आहे. झेंड्याचा फक्त रंग बदलून चालणार नाही. मनसैनिकांनी त्यांची मनं देखील बदलली पाहिजेत. उत्तर भारतीयांच्या विरोधातील भूमिका बदलली पाहिजे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे मनसेच्या अधिवेशनात काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-“राहुल गांधीनी आधी स्वत:च्या आजीचा इतिहास सांगावा आणि मग सावरकरांवर बोलावं”

-मुंबई महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा; फडणवीसांनी नगरसेवकांना दिले आदेश

-“चव्हाणांच्या दाव्याने खळखळ किंवा खळबळ होण्याचं कारण नाही”

-मंत्रालयानंतर सर्व शाळांमध्येही मराठी सक्ती, नवा कायदा तयार करण्याचे काम सुरु

-रेडमीच्या या फोनवर तब्बल तीन हजारांचा डिस्काऊंड! जाणून घ्या या जबरदस्त फोनचे फिचर्स…