Ramayan Lectrure In Madresahs l आता मदरशांमध्ये दिले जाणार रामायणाचे धडे! या कारणामुळे घेण्यात आला हा मोठा निर्णय

Ramayan Lectrure In Madresahs l मागील काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 22 जानेवारीला बहुचर्चित अशा अयोध्येच्या राम मंदिरात (Ram Mandir) रामललाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर संपूर्ण भारत देश राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर 22 जानेवारी रोजी देशातील अनेक ठिकाणी अक्षरशः दिवाळी सारखा उत्साह पाहायला मिळाला. या संबंधी आता आणखी मोठे अपडेट समोर येत आहे. (Ramayan Lectrure In Madresahs)

मदरशांमध्ये रामायण शिकवले जाणार : 

आता थेट उत्तराखंडमधील मदरशांमध्येही हिंदू आणि मुस्लिम मुलामुलींना रामायण शिकवले जाणार आहे. याबाबत उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी याबाबत अपडेट दिले आहेत. त्यांनी अपडेट देताना यावेळी सांगतले की, वक्त बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 100 हुन अधिक मदरशांमध्ये आम्ही मुलांना संस्कृत शिकवू आणि मुलांना रामायणाचे धडेही शिकवू जेणेकरून मुले त्यांच्या संस्कृतीशी जोडली जातील. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या इतिहासाचे भान असले पाहिजे. या मुलांना संस्कृतबरोबरच वेद, पुराण, हे देखील शिकवता येऊ शकते हे देखील त्यांनीय वेळी सांगतलं आहे.

Ramayan Lectrure In Madresahs l रामायण शिकवण्यासाठी नेमले जाणार विशेष शिक्षक :

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगीतल्याप्रमाणे मदरशांमध्ये रामायण शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, या शिक्षकांच्यामाध्यमातून मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे.

यापूर्वी देखील शादाब शम्स यांनी सांगितले होते की, आतापासून मदरशांमध्येही संस्कृतचे शिक्षण दिले जाईल, तर मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. काझमी यांनी मदरशांमध्ये मुलांना वेदांचे ज्ञान देण्याबाबतही (Ramayan Lectrure In Madresahs)सांगितले होते. या विधानांना मोठा विरोध झाला असला तरी आता याच मंडळाकडून रामायण शिकविण्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शादाब शम्स यांच्या या वक्तव्यानंतर देशातील राजकारण चांगलाच तापले असून या निर्णयाबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, तर मदरशांमध्ये रामायण नक्कीच शिकवले जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. (Ramayan Lectrure In Madresahs) सध्याच्या घडलेला या निर्णयाला विरोध होत असला तरी, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही असे शादाब शम्स असे म्हणाले.

News Title : Ramayan Lectrure In Madresahs

महत्वाच्या बातम्या –

First Brain Chip in Human l बापरे! मानवाच्या मेंदूमध्ये बसवली चिप, मेंदूवर ठेवणार नियंत्रण

Today Horoscope l या राशीच्या व्यक्तींनी पैसे खर्च करताना विचार करावा

Mercedes-Benz GLA Facelift Launched l 360 डिग्री कॅमेरा फीचर्ससह Mercedes-Benz GLA कार लाँच! पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Railway Jobs 2024 Recruitment l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार ! रेल्वेत हजारो लोको पायलट्सची बंपर भरती सुरु

Valentine Day Trip l ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये फिरायचा प्लॅन करताय? तर या ठिकाणांना नक्कीच भेट द्या