Valentine Day Trip l ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये फिरायचा प्लॅन करताय? तर या ठिकाणांना नक्कीच भेट द्या

Valentine Day Trip l प्रेमींसाठी फेब्रुवारी (February) महिना खूपच छान मानला जातो. फेब्रुवारी महिन्यातील व्हॅलेंटाईन डे स्पेशल असल्याने अनेक कपल्स या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या खास दिवशी कपल्स खूप (Couples) एन्जॉय करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी काही कपल्स फिरायला जातात. मात्र अशा कपल्ससाठी फिरण्यासाठी रोमँटिक ठिकाण कोणकोणती आहेत हे आपण जाणून घेऊयात…

ताजमहाल (Tajmahal) :

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणजेच ताजमहाल पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रियकरायसह आग्रा येथे जाऊ शकता. ताजमहालला भेट देताच तुम्ही रोमँटिक क्षणांमध्ये हरवून जाल. फेब्रुवारीमध्ये आग्राचे हवामान देखील खूपच उत्तम असते. ताजमहाल व्यतिरिक्त तुम्ही आग्रामध्ये आग्रा किल्ला (Agra Fort) आणि फतेहपूर सिक्रीला (Fatehpur Sikri) भेट देखील देऊ शकता.

मसुरी (MUSSOORIE) :

व्हॅलेंटाईन डेच्या खास मुहूर्तावर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर मसुरी हा उत्तम पर्याय आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात मसुरीमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेले पर्वत, हिरव्यागार दऱ्या (MUSSOORIE) आणि धबधबे सर्वांनाच वेड लावतात. मसुरीला ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हणून देखील ओळखले जाते. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून (Dehradun) मसुरी अगदी 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईन डे निम्मित तुम्ही मसुरी या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता.

Valentine Day Trip l कुमारकोम (Kumarakom) :

जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दक्षिण भारतात जाण्याचा विचार करत असाल तर केरळमधील कुमारकोम हे एक उत्तम ठिकाण (Kumarakom) आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे, रोमँटिक रिसॉर्ट्स आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तुमच्या व्हॅलेंटाईन डेला आणखीनच सुंदर बनवतील.

दार्जिलिंग (Darjeeling) :

नैसर्गिक सौंदर्यासाठी दार्जिलिंग जगभर प्रसिद्ध (Darjeeling) आहे. दार्जिलिंग हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. तुमचा व्हॅलेंटाईन डे येथे साजरा करण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. दार्जिलिंग हे ठिकाण जोडप्यांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. व्हॅलेंटाईन डे साजरा (Valentine Day) करण्यासाठी दरवर्षी हजारो कपल्स येथे येतात. टायगर हिल, रॉक गार्डन, झूलॉजिकल पार्क इत्यादी ठिकाणांना भेट देण्याबरोबरच तुम्ही टॉय ट्रेनचा देखील आनंद घेऊ शकता.

News Title : Valentine Day Trip

महत्त्वाच्या बातम्या-

Supriya Sule l या नेत्याबद्दल सुप्रिया सुळेंच मोठं वक्तव्य; ‘ते भारताचे मजबूत नेते आहेत, पण…

Budget 2024 l यापूर्वी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला नव्हे तर या तारखेला सादर केला जात होता! तारीख बदलण्यामागे काय आहे कारण?

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या तरुणांसाठी लग्नाचे योग जुळून येतील

Bigg Boss 17 Winner l मुन्नवर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता! मिळाले तब्बल इतके लाख रुपये

Heart Attack Winter l हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतोय? हे तीन व्यायाम करा