‘रामायण’, ‘महाभारता’नंतर आता ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ही प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई |  ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली. आता 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ या दोन्ही लोकप्रिय मालिका सुद्धा पुन्हा एकदा टीव्हीवर दाखवाव्यात, अशी जोरदार मागणी सोशल मीडियातून करण्यात येत आहे.

रामानंद सागर यांच्या रामायण आणि बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत सीरियलनंतर आता सरकारने ‘चाणक्य’ आणि शक्तीमान’ या दोन मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दोन्ही मालिका कधीपासून टीव्हीवर दाखवल्या जाणार आहेत हे अद्याप कळलेलं नाही.

सध्या देशावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यंत कुणालाही त्यांच्या घरातून बाहेर पडायची परवानगी नाही.

लॉकडाऊनमुळे इतर सर्व मालिकांचे, सिनेमांचे शूटही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना घरी बोअर होऊ नये यासाठी ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवली जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-इस्लामपूरमध्ये आढळलेले कोरोनाचे रुग्ण मोदींवर टीका केल्याची शिक्षा- अवधूत वाघ

-दिल्लीत एका धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

-भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

-“स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडलेले”

-मुंबई पालिका आयुक्तांचा ‘तो’ निर्णय मंत्री नवाब मलिकांनी मागं घ्यायला लावला