विधानसभेसाठी रिपाइंला हव्यात ‘एवढ्या’ जागा; आठवलेंची मागणी

मुंबई : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आता यातच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.

आगामी निवडणुकीत रिपाइंला 10 जागा हव्यात आणि यावेळी रिपाइं भाजपच्या नव्हे तर स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवेल, असं आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपने गेल्यावेळी आम्हाला ज्या 8 जागा दिल्या होत्या, त्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. जर रिपाइंला सोबत ठेवायचं असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे, असंही आठवले म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेेने मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी 10 जागांवर आठवलेंनी हक्क सांगितला आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांच्या वाट्याला 8 जागा राहतील. या कारणामुळे इतर घटकपक्ष नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भाजप-शिवसेनेमध्ये आज (गुरुवार) झालेल्या चर्चेत भाजपने 160 जागांची मागणी केली आहे. तर शिवसेनेने 110 पेक्षा कमी जागा स्विकारायला नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-