“बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्याचे सांगून किती दिवस…”; रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा विरोधी पक्षनेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेल्यापासून भलतेच आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत.

ते रोज शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असल्याचे सांगून किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असे रामदास कदम म्हणाले.

उद्धव ठाकरेंना जे काही मिळाले, ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून अपोआप मिळाले आहे. आदित्य ठाकरेंना पक्षात जे स्थान मिळाले आहे, ते उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून मिळाले आहे.

त्यामुळे आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव घेऊन आणि त्यांचा वारस म्हणून किती दिवस लोकांना ब्लॅकमेल करणार आहात, आणि किती दिवस लोकांना भावनिक आव्हान करणार आहात, असा प्रश्न कदमांनी विचारला आहे.

पक्ष संघटना उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी वाढविली नाही, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढविली, असे रामदास कदम म्हणाले. त्यांनी यावेळी ठाकरे कुटुंबियांवर टीका केली.

रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली आहे. त्यांनी आपण देखील आगामी काळात महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी रत्नागिरीचे आमदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीका केली आहे.

रामदास कदम यांच्या टीकेवर शिवसेनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. आगामी काळात रामदास कदम आणि शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“शहाजी बापू पाटील पन्नास खोक्यांतून तुमच्या बायकोला…”; युवासेनेची बापूंना प्रतिक्रिया

काँग्रेसचा नवीन अध्यक्ष महाराष्ट्रातून? नाना पाटोलेंसह ‘या’ नेत्यांच्या नावाची चर्चा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मेळघाट दौरा गाजतोय, फोटो सोशल मिडियावर व्हायरल

Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे ताजे दर

दाऊदला पकडण्यासाठी एनआयए सज्ज, केली मोठ्या बक्षिसाची घोषणा