औरंगाबाद महाराष्ट्र

राणा जगजितसिंह पवारांना धक्का देणार??; राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार!

उस्मानाबाद |  उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील 30 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. किती दिवस आणखी विरोधात रहायचं, असा प्रश्न करत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राणा जगतजितसिंह यांच्यातले संबंध ताणले गेल्याने ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहेत.

अजित पवार यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे. राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र या केवळ बातम्याच आहेत, त्यात काही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

गुरूवारी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या देखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीतील मोठमोठी घराणी भाजपमध्ये प्रवेश करतील, असा बॉम्ब भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला खिंडार; चित्रा वाघ ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार???

-सत्तेत आलो तर भूमिपुत्रांना नोकरीत 75% आरक्षण देणार; अजित पवारांचं मोठं आश्वासन

-मोदी लाटेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

-सचिन अहिरांच्या मनगटावर ‘शिवबंधन’; शिवसेनेचे सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर?

-“भाजपचा बकासूर झालाय…भूकच भागत नाही”

IMPIMP